संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सुगंधित तम्बाखु, पान मसला व नगदी असा १३,७९२ रू. चा मालासह आरोपीस पकडले.
कन्हान :- पोस्टे अंतर्गत इंदिरा नगर कन्हान येथिल संजय गंगवानी यांचे गोडावुन मध्ये स्थागु्अ शाखा नागपुर ग्रामिण पथकाने धाड टाकुन सुगंधित तम्बाखु १४ किलो, पान मसला साहित्य व रोख रक्कम असा एकुण १३,७९२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरो पी ला पकडुन कारवाई केली.
शुक्रवार (दि.२२) सप्टेंबर ला ला पो.स्टे. कन्हान हद्दीत इंदिरा नगर कन्हांन येथिल संजय गंगंवानी यांचे गोडावुन मध्ये सुगंधित तम्बाखु व पान मसाला ठेवला आहे अशा विश्वनिय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकास मिळताच पथकाने पंच व स्टाप च्या मदतीने गोडावुन मध्ये धाड टाकुन कार्यवाही करण्यात आली. आरोपी संजय हरीलाल गंगंवानी वय ५० वर्ष रा.जागनाथ मन्दिर कामठी यांचे ताब्यातील सुगंधित तम्बाखु १४ किलो व पान मसला साहित्य व रोख रक्कम असा एकुण १३,७९२ रुपया चा मुद्देमाल पकडुन जप्त करित आरोपीची वैद्यकिय तपासणी करून पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन कन्हांन यांचे ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही स्थानिक गु्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पो उपनि. बट्टुलाल पांडे, पो हवा नाना राऊत, विनोद काळे, इक्बाल शेख, पो ना संजय भरोडीया, वीरेंद्र नरड, मोनु शुक्ला यांनी यशस्विरित्या पार पाडली.