मायावती 11 एप्रिल ला नागपूरात 

नागपूर :- 2024 च्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती  नागपुरात येत असून फुले-आंबेडकर जयंती निमित्ताने 11 एप्रिल रोजी त्यांच्या जाहीर निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही सभा उत्तर नागपूर च्या बेझनबाग मैदानावर दुपारी 3 वाजता होणार आहे.

11 एप्रिल ला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असून 14 एप्रिल हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा व बसपाचा 40 वा स्थापना दिन आहे. यावेळी बसपा महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा हत्ती या चिन्हावर लढत आहे. या सर्व बसपा उमेदवारांच्या प्रचारासाठी बहन मायावती नागपुरात येत आहेत.

या सभेसाठी बसपाचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी खासदार रामजी गौतम, दुसरे प्रभारी नितीन सिंग तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ऍड परमेश्वर गोणारे तसेच महाराष्ट्र राज्यातील बसपा चे सर्व लोकसभा उमेदवार प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी प्रेस ला दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने संसदेत पोहचणार - महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा विश्वास

Mon Apr 8 , 2024
– देऊळगाव वळसा व डोलारी येथे सभा यवतमाळ :- विदर्भात एकमेव असलेल्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने दारव्हा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा सुरू केलेला प्रचार येथील विकासासाठी मला संसदेपर्यंत नक्कीच घेवून जाईल, असा विश्वास महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी व्यक्त केला. आज दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी व व्याघ्रांगी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने आज देऊळगाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!