चोरीचे वडिलाकडून घेतले प्रशिक्षण!

– न्यायालय परिसरात बेशुध्द पडण्याचे नाटक

नागपूर :- पाकीट चोरीचे वडिलांकडून प्रशिक्षण घेतलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याने तीन लोकांचे पाकिट चोरले. पोलिसांचा वेळ आणि दीशाभूल करण्यासाठी त्याने न्यायालय परिसरातही बेशुध्द पडण्याचे नाटक केले. अब्दुल वाहिद, रा. मोठाताजबाग असे त्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

अब्दुलचे वडिल मोमीनपुर्‍यात राहायचे. त्यावेळी अब्दुल दहा वर्षांचा असेल. त्याच्या वडिलाने रेल्वेत चांगलाच धुमाकूळ घातला होता. वडिल प्रवाशांचे पाकिट चोरायचे तेव्हा अब्दुलही सोबत असायचा. वडिलांकडूनच त्याने पाकीट चोरीचे धडे घेतले. आज पाकीट चोरी करण्यात अट्टल बनला आहे.

लोहमार्ग पथक 23 जूनला विदर्भ एक्सप्रेसची झडती घेवून परत जात असताना अब्दुल पोलिसांना पाहून पळाला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडती घेतली असता पॅटच्या खिशात रोख रक्कम मिळून आली. यासंदर्भात विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता केरळ एक्सप्रेसच्या प्रवाशाचे पाकीट चोरताना दिसून आला. तसेच आणखी दोन चोर्‍या त्याने केल्या. अशा एकूण तीन चोर्‍याची त्याने कबुली दिली. गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर केले. न्यायालय परीसरात बेशुध्द होण्याचे नाटक केले. त्याला मेयो रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी सुध्दा सांगितले. तो पोलिस अभिलेखावर असून आता त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलिस हवालदार महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, अविन गजवे, चंद्रशेखर मदनकर, गिरीश राउत, मंगेश तितरमारे यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर

Fri Jun 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतिचे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या आदेशान्वये पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील वारेगाव, चिखली, नान्हा मांगली,गारला,नेरी,उमरी,बिडगाव, वरंभा,बाबूलखेडा,चिकना,कवठा या 14 ग्रामपंचायतीत 21 जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे अनुसूचित जाती महिला,अनुसूचित […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com