संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव येथील नागपूर वेल्डवायर प्रायवेट लिमिटेड नामक कुलुपबंद फेक्ट्री मधून अज्ञात चोरट्याने फेक्ट्री च्या मागची टिनाची शीट स्क्रू उघडून कंपनीत अवैधरित्या प्रवेश करून 3 लक्ष 50 हजार रुपये किमतिचे साहित्य चोरून नेल्याची घटना गतसकाळी 10.30 दरम्यान उघडकीस आले असून यासंदर्भात फिर्यादी प्रकाश लक्ष्मणराव तारक वय 40 वर्षे रा पारडी नागपूर ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457, 454, 380 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
चोरी गेलेल्या माल मधून 25 नग मेटर स्क्रु बाॅक्स एकूण कि.अं. 1,70,000 रुपये, 80 नग रोल फाॅरमींग मशीन सेट जुने वापरते कि.अं. 1,20,000 रुपये, 14 नग वजनी बट प्रत्येकी 20 किलो वजनाचे जुने वापरते एकूण कि.अं. 30,000 रुपये, 3 नग लोखंडी रोल क्वाईल प्रत्येकी वजन 70 किलो वजनाचे जुने वापरते एकूण कि.अं. 10,000 रुपये, 02 नग कटर मशीन बाॅस कंपनीची जूनी वापरती कि.अं. 9,000 रुपये, 01 नग मोठा लोखंडी जॅक जूना वापरता कि.अं. 6000 रुपये 01 नग हॅन्ड ग्रॅन्डर मोठे जूने वापरते कि.अं. 3000 रुपये, 20 फूट वेल्डिंग मशीन वायर जूने वापरते कि.अं. 2000 रुपये असा एकूण कि.अं. 3,50,000 रुपयाचे साहित्य चोरीस गेले आहेत.पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.