मराठी राजभाषा दिवस व कवी कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नागपूर :-सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून कवी कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगरपालिका नेहरूनगर येथील कर्मचारी शंकर मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक खरे होते व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी मार्गदर्शन केले. शाळेचे विद्यार्थी प्रतिक वायले व राखी शर्मा यांनी मराठी माणसांच्या वेशभूषा परिधान केल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, चारोळ्या, भाषण, प्रश्नमंजुषा अशा विविध माध्यमातून मराठी भाषेविषयी आपले विचार व्यक्त केले. शाळेतील सहायक शिक्षक विजेश आडे यांनी स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली बुरबुरे व आभार प्रदर्शन भारती नगरारे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात पसरले अवैध सावकारांचे जाळे

Mon Feb 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमम)अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे मात्र हा कायदा केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.आता कामठी तालुक्यातील शहरासह ग्रामिण भागातही अवैध सावकाराचे जाळे पसरले असल्यामुळे गरजू व्यक्तींना कर्ज देऊन त्यांच्याकडून व्याज वसूल करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व सामान्य नागरिकाही मेटाकुटीस आला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com