मराठीचा सांस्कृतिक वारसा दुबईत यशस्वी

नागपूर :- मराठीचा सांस्कृतीक वारसा हा कार्यकम फेब्रुवारी 23 / मे 23 ला नागपूरला अनुक्रमे सुरेशभट सभागृह आणि वसंतराव देशपांडे सभागृह येथे यशस्वी रित्या संपन्न झाला. वसंतराव देशपांडे सभागृहच्या कार्यक्रमात दुबई येथील मराठी भाषिक काही लोक उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर हया लोकांनी मराठीचा सांस्कृतीक वारसा हा कार्यक्रम दुबईला सादर करण्याची गळ घातली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर दुबई येथील मराठी भाषिक मंडळांनी हा कार्यक्रम आयोजीत करण्याची तयारी दाखवली आणि दिवाळीनंतर हया कार्यक्रमाचे नियोजन कसे असेल हयाविषयी चर्चा होवून त्यावर निर्णय घेण्यात आला की 5 मे रोजी हा कार्यक्रम दुबई येथे साजरा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून Avenue Pearls Event, दुबई हयांचे आयोजनाखाली परिचय बहुउद्देशिय संस्था नागपूर निर्मित / दिपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोजीत ‘मराठीचा सांस्कृतीक वारसा’ हा कार्यक्रम स्वप्न स्टडिज आभाळाखालची शाळा, पुणे, Siwiss International School, Dubai, येथे अतिशय भव्य स्वरूपात सादर करण्यात आला. आमच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमात 39 सहभागी कलावंतापैकी 30 कलावंत हे जेष्ठ महिला नागरीक (सिनीअर सिटीजन) आहेत. जेष्ठ महिला या हाऊस वाईफ आहेत. आणि या सर्व जेष्ठ महिला कलाकार पहिल्यांदाच स्टेज वर आल्या आहेत.

या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, निवेदन अनघा अरुण वेखंडे, सह दिग्दर्शन- अबोली कुळकर्णी, नृत्य दिग्दर्शन रश्मी न्हावले, नैपथ्य- कुणाल न्हावले, पुण्यशील लांबट, रितेश भदाडे, वेशभुषा श्रीमंत योगी नाटय श्रृंगार गृह, मेकअप – लालजी श्रीवास, लाईट बाबा पद्म, तंत्र निर्देशन शंतनू नेटके जैन, गायक – मनिषा कुळकर्णी, श्रध्दा डाऊ, अवंती काळे, वादक मिलींद माणके (दुबई) खंजिरी, ओंकार (दुबई) हार्मोनियम, अतुल वाडेकर (दुबई) सिंथेसायझर, चैतन्य पाठक (दुबई) तबला, मयुर सुर्वे (दुबई) झांज, सहभागी कलाकार -शुभांगी पोहरे, कल्पना महल्ले, अंजली पारधी, छाया कलासुआ, शुभदा कुलकर्णी, जुई पोहरे, रेखा भारव्दाज, निलिमा देशपांडे, संगीता शेंडे, मिनाक्षी तडस, शोभा बावणकर, प्रिती भोयर, वनिता मुंगेलवार, श्रुती सायखेडकर, वैशाली जोशी, ज्योती कन्नाके, माधुरी पाखमोडे, सविता घुसे, संजय डाऊ, संजय कुळकर्णी, शिरिष देशपांडे, सोनाली काळे, मेशना राजपुत, दिलीप पोहरे, अरुण वेखंडे, मिलींद कुळकर्णी, मास्टर अधिश कुळकर्णी, मास्टर त्रिशांक न्हावले, शिवाजी महारांच्या भुमिकेत सत्यम निमजे मराठीची अस्मिता राखून प्रत्येकांनी प्रत्येक सणाचे महत्व दुबईकरांच्या मनात बिंबविले. मराठी चैत्र महिन्यापासून तर फाल्गुनापर्यंत प्रत्येक लहान- लहान सणांचे महत्व निवेदन, नाटिका, नृत्य स्वरुपात सादर करून कार्यक्रम भव्य दिव्य करण्यात हातभार लावला. मराठी माणसाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या राज्यभिषेकाचा अव्दितीय सोहळा डोळयाचे पारणे फेडणारा ठरला. तर स्व.श्री. मुकूंद पुल्लीवार लिखीत

‘सांभाळावा अमूल्य ठेवा हवे तिथे मग वसा, मराठी संस्कृतीचा वारसा’ असे म्हणत हया भव्य दिव्य कार्यक्रमाची दुबईला सांगता झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज...

Wed May 15 , 2024
वाराणसी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील वाराणसीची निवड केली आहे. 2014 मध्ये ते पहिल्यांदा वाराणसीमधून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले. 2019 मध्येही त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली आणि जिंकले. यंदाचा 2024 च्या निवडणुकीच्या लढाईतही ते वाराणसीमधून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. वाराणसीतून निवडणुकीसाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com