विनयभंग करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातून शिक्षा

कन्हान :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र. २३५/२०१८ कलम ३५४ (अ. ड).३४ भादवि सहकलम १९(१), १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील पिडीता फिर्यादी ही सिलाई मशीनचे काम शिकुन कन्हान वरुन आपले घरी परत येत असता यातील आरोपी नामे- १) मोनु उर्फ नौशाद ईदरीस शेख वय २० वर्ष रा. कांद्री २) साहील चंद्रभान चौधरी वय २१ वर्ष रा. पिपरी कन्हान ३) दयाशंकर नेमलाल पासी, वय २१ वर्ष रा. पिपरी कन्हान यांनी पिडीतेला थाबवून तिचे नाव गाव मोबाईल क्रमांक विचारला तेव्हा पिडीतेने नकार दिला असता आरोपीतांनी संगणमत करून पिडीतेसोबत टॉन्टींग केले. सदर प्रकरणाचे तपास पोलीस उपनिरीक्षक राजु हाके यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक २४/०५/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश ए. डी. जे. पांडे यांनी वरील नमुद आरोपी क्र. १ यास कलम १२ पोक्सो मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रु. दंड दंड न भरल्यास २ महीने सश्रम कारावास, तसेच ३५४(ड) भादवि मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रु. दंड दंड न भरल्यास २ महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे तसेच ईतर दोन आरोपी यास निर्दोष रिहा करण्यात आले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोशि/ १४६८ सैफुल्लाह अहमद पो स्टे कन्हान यांनी मदत केली आहे.

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोटीतून शिक्षा

Thu May 25 , 2023
पो.स्टे. अरोली :- फिर्यादी नामे- राजकुमार फुलचंद शेटे, वय ३८ वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. अरोली येथे अप. क्र. ६२/२०२० कलम ३०२ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील मृतक नामे- दिगीवर जागोवा घुले, वय ५२ वर्ष रा. रेवराल ता. मौदा व आरोपी नामे- मुरलीधर कानुनी ढोमणे, वय ४० वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांचे घर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com