आंतराराज्यीय गांजा तस्करी मधील मूख्य आरोपीस अटक

– नागपुर ग्रामीण पोलीसाची कारवाई

नागपूर :-पोलिस अधीक्षक, नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दिनांक ११/०१/२०२४ रोजी गोपनीय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पोलिस ठाणे बुटीबोरी हद्दीत गुंगिकारक वनस्पती गांजा चे वाहतूक करणारे कटेनर क्र. HR-55/S-2346 ताब्यात घेवून त्या मधून एकूण ४९५ किलो गांजा जप्त करून मिळून आलेले चालक व कंडक्टर विरूद्ध पोलिस ठाणे बुतीवोरी येथे अप. क्र. १५/२४ कलम २०,२२ NDPS Act अन्वये गुन्हा नोंदविलेला होता, आज पावेतो नागपुर ग्रामीण परिसरातील अश्या प्रकारचे गुन्ह्या मध्ये मुख्य आरोपी अटक न झाले बाबत पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो. से) यांचे निदर्शनास आले वरून त्यांचे आदेशानवये सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे बुट्टिबोरी कडून स्थानिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला. पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिनांक १३/०१/२०२४ पासून सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बावत कोणताही सुगावा नसताना पथकाने खाजगी वाहनाने राजस्थान, दिल्ली, हरियाणा राज्यात जावून अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती प्राप्त करून उत्तर प्रदेश वाराणसी येथे सतत ७ दिवस सापळा रचुन जिवाची पर्वा न करता सदर गुन्ह्यातील गांजा विकत घेणारा मुख्य आरोपी नामे आलोक रामविलास सिंग, वय ३५ वर्ष, रा. बजरंग विहार कॉलनी, taktakpur वाराणसी यास ताब्यात घेतले. आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले वरुन मा, न्यायालयातून आरोपीचा दिनांक ०५/०२/२०२४ पर्यंत PCR घेण्यात आला, सदर मुख्य आरोपीचे सांगणे प्रमाणे सदर गुन्ह्यांतील गांजा त्यास विकणारा मुख्य आरोपी ने शोध कामी PCR मधील आरोपी सह पथकाने राज्य ओडिशा येथे जावून नश्चल प्रभावित क्षेत्र पोलिस ठाणे सेमिलिगुडा येथे सुद्धा २ दिवस सापळा रचुन वेषांतर करून जिवाची परवा न करता सेमिलिगुडा येथे किरायने राहत असलेला मुख्य आरोपी नामे भिमसेन उर्फ रूपा नंदा पांगी, वय ३२ वर्ष, रा. कुसुमा, जी. कोरापुट, ओडिशा यास ताब्यात घेवून दिनांक ०५/०२/२०२४ रोजी अटक केली आहे, नमूद दोनही आरोपितांनी सदर चा गुन्हा केल्याचे मान्य केले असून पुढील तपास सुरु आहे. पथकाने दिनांक १३/०२/२०२४ पासून सतत प्रवास करून अलीकडील नागपुर ग्रामीण हद्दीतील अशा प्रकारचे गुन्ह्यात नाटमय रित्या नमूद दोन्ही अरोपितांना ताब्यात घेवून गांजा चा व्यवसाय करणारे आरोपितांना मा. पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो. से) यांचे मार्गदर्शनात गजाआड करण्यात यश प्राप्त केले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मारेखेडे, पोहवा मिलींद नांदुरकर, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दंगा करून गैरकायदयाची मंडळी करणाऱ्या आरोपीतांना अटक

Thu Feb 8 , 2024
उमरेड :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयचे मागे परसोडी उमरेड येथे दिनांक ०६/०२/२०२४ चे १८.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे तबस्सुम सलिमखान पठाण, वय ४४ वर्षे, रा. भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयाचे मागे परसोडी उमरेड व आरोपी नामे १) मेहमुद बानो हबीबखान पठाण वय ७० वर्षे. २) तन्वी उर्फे यूक्ती जावेद पठाण, वय ४२ वर्षे ३) शहनाज अलीमखान पठाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com