संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचे उद्देश्य स्पष्ट करतांना सत्यशोधक समाजाची आवश्यता व तत्त्वे यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी सर्वांना सत्यशोधक समाजापासून प्रेरणा घेऊन मानवतेच्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती, डॉ.रेणू तिवारी, आय. क्यू.ए.सी. संयोजक डॉ.प्रशांत ढोंगले, सी.डी.सी. सदस्य डॉ.जयंत रामटेके, डॉ. अझहर अबरार, डॉ.तुषार चौधरी, डॉ.विनोद शेंडे, डॉ.महेश जोगी, डॉ.विकास कामडी, प्रा. अमोल गुजरकर, ग्रंथपाल शिल्पा हिरेखान यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्तावित समिक्षा बादुले, संचालन समता मेश्राम तर आभार रवींद्र पाटील यांनी मानले.