महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील अपघातग्रस्तासाठी ठरल्या देवदूत

– जखमी युवकास स्वत:च्या वाहनाने उपचारासाठी आणले

यवतमाळ :- राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणे हे कोणत्याही व्यक्तीचे प्रथम कर्तव्य असते. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील – महल्ले यांनी मध्यरात्री अपघातानंतर रस्त्यावर पडून असलेल्या जखमी व्यक्तीला तत्काळ मदत करत माणुसकीचा परिचय दिला. राजश्री पाटील यांच्या या कृतीची नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

राजश्री पाटील या सोमवारी मध्यरात्री प्रचारसभा आटोपून यवतमाळकडे परत येत होत्या. दरम्यान दारव्हा-यवतमाळ मार्गावर जामवाडी नजीक एक चारचाकी वाहन खांबास धडकल्याने अपघात होवून नेर तालुक्यातील मोझर येथील अक्षय निचत हा तरूण गंभीर जखमी झाला होता. रात्रीची वेळ असल्याने त्याच्या मदतीसाठी कोणीही थांबले नव्हते. हे दृष्य नजरेस पडताच राजश्री पाटील यांनी आपला ताफा थांबवून त्यांनी जखमीला तत्काळ मदतकार्य सुरू केले. तातडीने पोलीस व शासकीय रूग्णालयात संपर्क केला. जखमीला कार्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या वाहनात घेवून तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. तेथे जखमी युवकास दाखल करून त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी जखमी तरूणास तपासून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर जखमी अक्षयला भेटून त्याची विचारपूस करून राजश्री पाटील पहाटे आपल्या निवासस्थानी पोहोचल्या. राजश्री पाटील यांच्या या कृतीची जिल्ह्यात जोरदार चर्चा असून मदतीच्या या क्षणांचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला असून नागरिक राजश्री पाटील यांचे या कार्याबद्दल कौतूक करत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Ramdevbaba Solvent Limited IPO Opens on April 15, 2024

Tue Apr 9 , 2024
● Issue Size – Up To 59,13,600 Equity Shares of ₹ 10 each, Issue Size – ₹ 47.31 Crores – ₹ 50.27 Crores, Price Brand– ₹ 80 – ₹ 85, Market Lot Size – 1,600 Equity Shares Nagpur :- Ramdevbaba Solvent Limited, headquartered in Nagpur, is a manufacturer and distributor of Physically Refined Rice Bran Oil, has announced its plan […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!