उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पसंतीचे राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई येथे आयोजित जपानच्या इशिकावा येथील उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, सचिव डॉ श्रीकर परदेशी, चौदा सदस्यीय शिष्टमंडळाचे अध्यक्ष यामामोटो हिरोशी, उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात उद्योगाला पोषक वातावरण तयार झाले आहे. जपान येथील उद्योजकांच्या गुंतवणूक सोयीसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. महाराष्ट्र देशात विदेशी गुंतवणुकीत प्रथम स्थानी आहे. कर्नाटक, गुजरात, दिल्ली या तीन राज्याच्या एकत्रित विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.कांबळे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या ओद्योगिक क्षमतेबाबत सादरीकरण करून माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जपानी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे शाल आणि बोधिसत्व यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.

शिष्टमंडळाचे प्रमुख यामा मोटो यांनी सुरुवातीस शिष्टमंडळातील सदस्यांचा परिचय करून दिला तसेच इशिकावा येथील पर्यटन व उद्योगातील विकासाबाबतची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन; कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण

Fri Mar 8 , 2024
मुंबई :- राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कृषिमंत्री मुंडे म्हणाले, देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com