संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तनाव मुक्त जीवन जगण्याकरिता विपश्यना गरजेचं – ॲड. सुलेखा कुंभारे .
कामठी :- ज्या पध्दतीने शरीराला निरोगी ठेवण्याकरिता योगाच महत्व आहे. त्याच पध्दतीने तनाव मुक्त जीवन जगण्याकरिता विपश्यनाची अत्यंत गरज आहे. वर्तमान परिस्थितीत विद्यार्थी, युवा, महिला, प्रशासकीय अधिकारी व इतर श्रेत्रात काम करणा-या स्त्री – पुरूषांन मध्ये प्रचंड मानसीक तनावामध्ये जीवन जगत आहेत. या सर्व समाजातील घटकांना तनाव मुक्त जगण्याकरिता विपश्यना करणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की भविष्यामध्ये बाल शिबीर तसेच विद्यार्थी, युवा, प्रशासकीय अधिकारी इत्यादी समाज घटकांकरिता सुध्दा स्वतंत्र निवासी ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात येईल.
विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रैगन पैलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरच्या 6 व्या स्थापना दिना निमित्त आज शुक्रवारला सामुहीक ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहीक ध्यान शिबीराचे शुभारंभ सकाळी 9:00 वाजता करण्यात आले असुन स विपश्यनाचार्य गोयंका गुरूजी यांचे ऑडीयो मार्फत प्रर्वचनाने समारोप करण्यात आले. या एक दिवसीय सामुहीक ध्यान शिबीरामध्ये अनेक सहायक आचार्य व बाल शिबीर शिक्षक यांची विशेष उपस्थिती होती. या सामुहीक ध्यान शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणात साधकांनी सहभाग घेवून शिबीराचा लाभ घेतला.
गेल्या सहा वर्षापासुन ड्रैगन पैलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर मध्ये नियमीत 10 दिवसीय, 3 दिवसीय व 1 दिवसीय शिबीराचे आयोजन केल्या जात आहे. या शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोप-यातुन साधक सहभागी होवून ध्यान शिबीराचा लाभ घेत असतात. शिबीरामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर राज्यातुन सुध्दा साधकांना ड्रैगन पैलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.
या शिबीराला यशस्वी करण्याकरिता रेखा भावे, रजनी लिंगायत, वंदना आळे, सुमन घरडे, शालु सावतकर, सुनील वानखेडे, सचिन नेवारे, ईत्यादींनी अथक परिश्रम घेतले.