ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू-अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांचे सरकार असल्याची नातेवाईकांची भावना

मुंबई :- उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्यूमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केले. या दु:खद प्रसंगात मुख्यमंत्र्यांनी केलेली तातडीची मदत नातेवाईकांसाठी दिलासा देणारी ठरली.  

            पालघर जिल्ह्यातील काही यात्रेकरू ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरूंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३ वर्षे)वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४० वर्षे)पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ वर्षे)दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय ५३ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.

            अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने उत्तराखंडमधील यंत्रणेशी संपर्क साधला आणि जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी जखमींवर उपचाराची माहितीही घेतली. 

            अपघातातील मृतांचे शवविच्छेदन आणि इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्याचदिवशी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आलेतेथून पहाटे हे पार्थिव मुंबईत विमानाने आणण्यात आलेत्यानंतर लगेचच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

            इतक्या जलदगतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडून कोणत्याही अडचणींशिवाय पार्थिव नातेवाईकांकडे सुपुर्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच प्रशासकीय गतिमानतेचे कौतुक होत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहेहेच यातून अधोरेखित झाले आहेअशी भावना अपघातग्रस्तांचे नातेवाईक दयानंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात 'ड्रोन शेती' च्या प्रसारासाठी  राज्य शासन प्रयत्न करणार  - अब्दुल सत्तार

Mon Sep 12 , 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी मंत्र्यांची ग्वाही  नागपूर : – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमध्ये तुषार क्रांती घडवून आणण्याचे अभिवचन दिले आहे. महाराष्ट्र शासन यासाठी विविध क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल. तसेच ड्रोन शेतीच्या प्रचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.             वनामती व ऍग्रो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!