यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी आर्णी येथील स्वर्गीय राजकमलजी भारती कला आणी वाणिज्य व श्रीमती सुशिला राजकमलजी भारती विज्ञान महाविद्यालयात महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याला मार्गदर्शन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.एन.ए. पिस्तुलकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.भुपाल राठोड, समालोचक डॉ.जितेंद्र कौशल्ये, कार्यक्रमाचे समन्वयक श्रीकांत वानखडे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणी विकास महामंडळाचे गिरीश अंबाघरे, अमित लोणारे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील निरीक्षक जी.डी.राऊत यांनी आश्रमशाळा, शिष्युवृत्ती, वसतीगृह, आधार योजना, घरकुल, पायाभूत सुविधा बाबतच्या योजना, भटक्या जमाती क प्रवर्ग (धनगर) समाजासाठी राबविण्यात येण्याऱ्या विविध योजना, सामुहिक विवाह मेळावा कन्यादान योजना, महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार योजना, वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार, वसंतराव नाईक तांडा सुधार योजना इत्यादी शासकीय योजनांची माहिती दिली.