छत्रपतींच्या विचारांचा वारसा लोक हितकारक : जयदीप कवाडे

– पीरिपातर्फे शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

मुंबई/नागपुर :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रगाढ बुद्धिमत्ता व युद्धकौशल्याच्या जोरावर स्वराज्य निर्मिती करून देशात नवीन चेतना निर्माण केली. लोक कल्याणकारी राज्य आणि उत्तम प्रशासन कसे असावे याचे एकमेव उदाहरण म्हणजे शिवरायांचे स्वराज्य होय. तळागाळातील गोरगरीब रयतेला आपले वाटणारे असे स्वराज्य शिवरायांनी निर्माण केले. ते केवळ आणि केवळ जनतेच्या कल्याणासाठी. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नव्हे. स्वाभिमान आणि समानतेचा छत्रपतींच्या विचारांचा वारसा लोक हितकारक आहे. असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. सीताबर्डी, आंनदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात शिवाजी महाराजांची 394 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमात प्रतिमा जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, युवक आघाडी प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी, नागपुर शहर अध्यक्ष कैलाश बोंबले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयदीप कवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय पराक्रमी व्यक्तिमत्व होते. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमाने त्याला पराभूत करता येते हे महाराजांनी वारंवार सिद्ध केले आहे. प्रगाढ शिक्षणाचे धनी असेलेल्या महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रगाढ बुद्धिमत्ता व युद्धकौशल्याच्या जोरावर स्वाराज्य निर्मिती करून देशात नवीन चेतना निर्माण केली. त्यांच्या युक्ती, बुद्धी, शक्तीबाबत अनेक इतिहासकारांनी लिहले आहे. महाराजांचे शिक्षण कौशल्यामुळेच शिवराय रयतेचे राज्य स्थापन करण्यास यशस्वी झाले. त्यामुळे राजकारन करीत असतांना प्रत्येकांनी त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा अभ्यास करावा असेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. शिवाजीराजे म्हणजे जगातील आदर्श नेतृत्व आहे. महाराज जगातील अनेक उत्तम व्यवस्थांचे निर्माते आहेत. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगभर एक प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत करून एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था तयार केल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.

शिवाजी महाराज पहिले लोकशाही राज्याचे शिल्पकार

म्हणजेच शिवाजी महाराजांचे राज्य लोकाभिमुख होते. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा बळीराजाला छत्रपतींच्या स्वराज्यात सुखी ठेवले. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी महाराजांनी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित करून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचल्याचेही जयदीप कवाडे यांनी सांगितले. याप्रसंगी सविता मेश्राम (भवजार), संघमित्रा पाटोले, सिमा वानखेडे, कुसुम गेडाम, प्रज्योत कांबळे, दिलीप पाटील, भीमराव कळमकर, प्रकाश मेश्राम, कुशीनारा सोमकुंवर, नीती शंभरकर, अरुण साखरकर, महेंद्र नागदेव, अजय चव्हाण, बापू भोंगाडे, आत्माराम वंजारी आदि पीरिपाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महासंस्कृती महोत्सवात रंगली हास्यजत्रा !

Tue Feb 20 , 2024
गडचिरोली :- महासंस्कृती महोत्सवात आज हास्यजत्राच्या चमूने धमाल विनोद रंगवित सर्वांना पोट धरून हसायला लावले. सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मतदार जनगृतीवरील पथनाट्य व हास्यजत्रा कार्यक्रम सादर करण्यात आला. आमदार देवराव होळी, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com