संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3 :- नवरात्री म्हटले तर डोळ्यासमोर येतात ते रंगीबेरंगी तारुणांच्या उत्साहात सजलेले नऊ दिवस.तरुणांइला भक्तिमय वेड लावणारा हा एक उत्सव. भारतीय सणावारामध्ये तरुण पिढीला रस नाही असे वाटत असले तरी या नऊ दिवसात आयोजित रास गरबा, दांडिया महोत्सवात उत्सव साजरा करताना दिसतात .कामठी येथील माँ वैष्णवी रास गरबा आयोजन समिती लाला ओली कामठी च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत लाला ओली स्थित शिक्षक स्कुल प्रांगणात 9 दिवसीय महारास गरबा कार्यक्रमात भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त होत असून या धार्मिक भक्तिमय कार्यक्रमात मोठ्या संख्येत भक्तगणांचा उत्साह दिसून येत आहे.तर या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीवरचा त्यांचा विश्वासच यातून दिसून येत आहे.
माँ वैष्णवी रास गरबा आयोजन समिती कामठी च्या वतीने आयोजित माँ वैष्णवी रास गरबा महोत्सवात महाराष्ट्रीयन वेशभूषा, दक्षिण भारतीय व बंगाली वेशभूषा, उत्तर भारतीय पंजाबी वेशभूषा राजस्थानी आणि गुजराती अशा विविध वेशभूषेत गरबा नृत्य सादर केल्या जात आहेत तर या धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमात रास गरबातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.या नऊ दिवसीय महारास गरबा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाला ओली कामठी चे माँ वैष्णवी रास गरबा आयोजन समितिचे समस्त पदाधिकारी व सदस्यगण मोलाची भूमिका साकारत आहेत.