विद्यापीठातील अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागात एम.टेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँन्ड डेटा सायन्स अभ्यासक्रम

अमरावती :-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त एम.टेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँन्ड डेटा सायन्स या अभ्यासक्रमासाठी मंजुरी मिळाली असून सन 2024-25 सत्रापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

उपयोजित परमाणू विद्युत विभागाव्दारे व्दी वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविला जातो. अभियांत्रिकी शाखेत अंतर्भूत असलेल्या या अभ्यासक्रमाला स्नातक इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, इन्स्टØमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स तसेच 10अ2 स्तरावर गणित किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष पदवीप्राप्त विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक सत्रात प्रोफेशनल इलेक्टीव्ह विषयाचा समावेश करण्यात आला आहे व ओपन इलेक्टीव्ह विषय सुध्दा आहे. यामध्ये रिसर्च प्रोजेक्ट, इटर्नशिप व मुक्स आदींचा समावेश करण्यात आला आहे. प्रोफेशनल इलेक्टीव्ह विषयावर आधारित प्रात्याक्षिके समाविष्ट आल्यामुळे विद्याथ्र्यांना इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रमुख विषयासोबतच इतरही महत्वाच्या विषयांची प्रात्याक्षिके करता येतील. सोबतच इंट्रोडक्शन टू डाटा सायन्स अॅन्ड न्यूरल नेटवर्कस्, रिमोट सेÏन्सग, स्मार्ट सेन्सर्स, कॉम्प्युटर नेटवर्क, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयांचा समावेश आहे.

एम.टेक. चा कुठल्या क्षेत्रात उपयोग होणार

सध्या सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग वाढला आहे. देनंदिन व्यवहार, अनेक उपकरणांमध्ये, यंत्रांमध्ये तसेच इंटेलिजन्स व्हेईकलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅन्ड डेटा सायन्सचा वापर अपरिहार्य झालेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डाटा सायन्टीस्ट, आर्किटेक्ट, इंजिनिअर, बिझिनेस इंटेलिजन्स डेव्हलपर, डाटा अॅनॅलिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर, मशीन लर्निंग आर्किटेक्ट, प्रिन्सिपल डाटा सायन्टीस्ट, प्रॉडक्ट मॅनेजर, रोबोटिक्स सायन्टीस्ट आणि अनेक तत्सम संधी विद्याथ्र्यांना उपलब्ध होणार आहे.

विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी

एम.टेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅन्ड सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स, बिंग, याहू, इरुाो, इंडियन मिटरॉलॉजिकल डिपार्टमेंट (आय.एम.डी), सिमेन्स अशा अनेक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी विद्याथ्र्यांना उपलब्ध होणार असून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट लॅबॉरटरीज याशिवाय डाटा मायनिंग अॅन्ड अॅनॅलिसीस, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, युझर एक्सपेरिअन्स इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच उबेर, एन.व्ही.आय.डी.आय.ए., आय.बी.एम., इंटेल, फेसबुक, वॉलमार्ट, नाईके, पिओसिको आदिंसह अनेक तत्सम कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच, शिवाय स्वयंरोजगाराच्या संधी विद्याथ्र्यांना उपलब्ध होतील.

उच्च शैक्षणिक दर्जा

अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय डुडुल हे स्वत: विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता असल्यामुळे नविन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यपूर्ण व रोजगाराभिमुख आणि संशोधनपर अभ्यासक्रम त्यांनी विभागात सुरु केले आहे. विभागात त्यांचेसह इतर शिक्षकांना 11 पेटेन्ट्स मंजूर झाले आहे. वातानुकुलित प्रयोगशाळा, अद्ययावत यंत्रसामुग्रीने विभागात विकसित आहेत.

विभागातील तज्ज्ञ शिक्षकांकडून विद्याथ्र्यांना विषयासंबंधित प्रात्याक्षिके शिकविली जातात. विद्याथ्र्यांच्या सुविधेसाठी प्रयोगशाळा, संशोधन व विकास यासाठी अद्ययावत कार्यशाळा उपलब्ध आहे. विद्याथ्र्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने विभागप्रमुख डॉ. संजय डुडुल यांनी केले आहे.प्रवेशासाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात 9 ते 10 सप्टेंबर रोजी भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या 60 व्या अ‍धिवेशनाचे आयोजन

Sat Sep 9 , 2023
– भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी अधिवेशनाचे आयोजन- विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांची माहिती  नागपूर :- भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी आखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे 60 वे अधिवेशन 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित करणार येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com