संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पेंढरी येथील घटना
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथील प्रेमीयुगलाने आपल्या घराशेजारील घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ( दि.5) सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार , पेंढरी येथील मृतक गौरव राजेंद्र बगमारे ( वय 18 ) व जान्हवी जिवन नायले ( वय 18 ) यांनी मध्यरात्रीचा सुमारास गौरव बगमारे यांच्या घराशेजारील योगेश बगमारे यांच्या घरी एकाच दोराने गळफास घेत आत्महत्या केली. गेल्या एक वर्षापासुन दोघांचे प्रेम प्रकरण सुरु असल्याचे गावातील नागरीकांनी सांगीतले. गौरव बगमारे हा तथागत विद्यालय करंभाड येथील 12 चा विद्यार्थी होता. व तेथुनच त्याने परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचा सावनेर येथील आय.टी.आय मध्ये डिझेल मेकॅनीक करीता निवडही झालेली होती. आजपासून तो काॅलेज मध्ये जाणार होता. तसेच जान्हवी बगमारे ही पारशिवनी येथील हरीहर कनिष्ठ विद्यालयात 12 वी मधील विद्यार्थीनी होती. घटनेचा रात्री गौरव व जान्हवी हे मध्यरात्री पर्यंत मोबाईलवर चॅटींग करत असल्याचेही कळते. त्यांनी कदाचीत त्याचवेळी आपले आयुष्य संपविण्याचे नियोजन केले असावे. अशाही चर्चा सध्या होत आहे. या प्रेमप्रकरणाकरीता घरच्यांचा विरोध असल्याचेही समजते.
या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक हृदयनाथ यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताने , सहाय्यक फौजदार संदिप बेलेकर , पोलीस हवालदार वंदना मरकाम , पोलीस हवालदार अशोक उईके , गोपनीय अंमलदार पृथ्वीराज चव्हाण , सहाय्यक फौजदार विशाल इंगोले करीत आहे .