अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा,शंभर रूपयात चार शिधावस्तुंचे वाटप

भंडारा :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना आगामी दिवाळी सणानिमीत्त नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त आनंदाचा शिधा मिळणार आहे. प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच प्रति कार्ड 1 संच वाटप करण्यात येणार आहे. हा शिधाजिन्नस संच प्रतिशिधापत्रिका तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

माहे ऑक्टोंबर 2022 मध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांना 100 रूपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल वितरण करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोड यांनी कळविले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com