जिवानीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक ०२.०२.२०२४ चे २३.०० वा. ते २३.१५ वा. चे दरम्यान, फिर्यादीचे पती नामे मंगेश गणेश मेंडे, वय ४५ वर्षे, रा. उन्नती कॉलोनी, समता नगर, नारी रोड, कपिलनगर, नागपुर यांना त्यांचा परिचीत आरोपी नामे दत्तु उर्फ दत्त्या उर्फ राहुल रमेश रामटेके वय १९ वर्ष रा. मानव नगर, टेक्ानाका नारी रोड, नागपूर हा पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत संन्याल नगर, टेकानाका येथे भेटला त्याने फिर्यादीचे पती यांना “मुझे दारू पिनेको पैसे देने पड़ेंगे” असे म्हणुन पैसे मागीतले असता फिर्यादीचे पतीने पैसे न दिल्याने आरोपीने त्याचे जवळील चाकुने फिर्यादीचे पतीला डावे बाजुस छातीवर तिनवेळा वार करून गंभीर जख्मी केले. गंभीर जख्मी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता उपचारापुर्वी डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी नयना मंगेश मेंढे वय ३५ वर्ष यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पो, ठाणे कपिलनगर येथे पोउपनि ताळीकोटे ९६३७७०५०३१ यांनी आरोपीविरूध्द कलम ३०२ भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेवुन आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

अपघातात मृत्यू झालेले पोलीस हवालदार जयंत शेरेकर यांच्या कुटुबियांना ०१ कोटी रूपयाची मदत, नागपूर ग्रामीण पोलीस दल व एचडीएफसी बँकेचा पुढाकार

Sat Feb 3 , 2024
नागपूर :- ग्रमीण जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन पारशिवनी येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार जयंत शेरेकर, बक्कल नंबर १२२४ यांचे दिनांक २३/११/२०२२ रोजी कर्तव्यावर हजर असताना अपघाती निधन झाले होते. या अपघातामध्ये मृतक जयंत शेरकर यांच्या परिवाराला सहाय्य करण्याच्या दृष्टीकोणातून नागपूर ग्रामीण पोलीस दल व एचडीएफसी बँकेने सकारात्मक पाऊले उचलली. त्यानुसार दिनांक ०२/०२/२०२४ रोजी एचडीएफसी बँकेकडुन प्राप्त ०१ कोटी रुपये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com