लोंणखैरी व कवठा ग्रा. प. च्या पोटनीवडणुकीसाठी प्रत्येकी दोन-दोन उमेदवार निवडणूक रिंगणात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठी तालुक्यातील लोंणखैरी व कवठा ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेची पोटणीवडणूक 18 मे ला 

कामठी :- कामठी तालुक्यातील लोणखैरी ग्रा. प च्या प्रभाग क्र 1 च्या सर्वसाधारण (महिला)प्रवर्गातील रिक्त एक जागा व कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 चे सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त एक जागेसाठी येत्या 18 मे ला पोटनिवडणूक होणार असून आज 8 मे ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत कवठा चे उमेदवार झिबल रघुनाथ पारधी ने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कवठा 2 व लोणखैरीचे 2 असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

त्यानुसार लोंणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त एक जागेसाठी सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून कविता शेषराव जामगडे व सुरेखा पांडुरंग जामगडे आहेत तर कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त 1 जागेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून विशाल वसंता कापसे व कल्पना संजीव बारापात्रे हे आहेत .

या चारही उमेदवारांना आज 8 मे ला दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे तेव्हा या निवडणुकीत रिक्त एक जागेसाठी कोण निवडून येणार हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे.

लोंणखैरी ग्रा प चा पंचवार्षिक कार्यकाळ हा 10 फेब्रुवारी 2026 ला संपणार असून या प्रभागातील ग्रा प सदस्य उषा नत्थु अंजनकर ह्या 1 डिसेंबर 2022 ला अकस्मात मरण पावल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे तसेच कवठा ग्रा प पंचवार्षिक कार्यकाळ हा 29 डिसेंबर 2023ला संपणार असून कवठा ग्रा प चे प्रभाग क्र 1 चे सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रा प सदस्य व उपसरपंच शरद माकडे हे कलम 14 (1)(ग)अनव्ये अपात्र झाल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

जाहीर निवडणूक कार्यक्रमा नुसार 25 मे एप्रिल ते 2 मे पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले.3 मे ला नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात आली तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 मे ला दुपारी 3 वाजेपर्यंत एक उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर नुवडणूक रिंगणात असलेल्या चाट उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली .तर 18 मे ला निवडणूक तर 19 मे ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीष दिघाडे यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनी तीन तक्रारी निकाली

Mon May 8 , 2023
नागपूर :-  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित चार तक्रारींचा आढावा घेण्यात आला आणि तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या. उपायुक्त घनश्याम भुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिन पार पडला. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेतील दोन आणि वर्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेतील एक अशा एकूण तीन तक्रारींवर कार्यवाही करून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या . तसेच, प्रलंबित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!