लोकगर्जना प्रतिष्ठान करणार “वन नेशन वन इलेक्शन” वर चर्चा

नागपूर :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच “वन नेशन वन इलेक्शन” ही संकल्पना मांडली. यासंदर्भात एक समिती तयार केली. यावर देशात मतभिन्नता आढळून येत आहे. ही संकल्पना संविधानिक दृष्टिकोनातून कशी अंमलात आणता येईल, या संदर्भातील विचार मतदारांच्या लक्षात यावे म्हणून लोकगर्जना प्रतिष्ठानने एका चर्चेचे आयोजन केले आहे.

या चर्चेत नागपूर शहरातील प्रसिद्ध वकील सर्वश्री ॲड. श्रीरंग भंडारकर आणि ॲड. फिरदौस मिर्झा  आपले विचार व्यक्त करतील. हा कार्यक्रम रविवार दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राष्ट्रभाषा येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर  चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोकगर्जना प्रतिष्ठानचे शुभंकर पाटील यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देवेंद्र फडणवीस कोर्टाकडून दोषमुक्त घोषित

Fri Sep 8 , 2023
नागपुर :- २०१४ च्या शपथपत्रातील गुन्ह्याप्रकरणात, देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाने दोषमुक्त घोषित केले आहे. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देण्यात आला आहे.प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालात फडणवीस दोषमुक्त ठरले आहेत. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com