सेवा पंधरवाडा लकडगंज झोन येथे साजरा

नागपूर :-  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत मनपाच्या कर व कर आकारणी विभागातर्फे लकडगंज झोन अंतर्गत शुक्रवार दि. ३०.०९.२०२२ ला अण्णाभाऊ साठे समाजभवन, भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोड येथे आयोजित नामांतरण व नवीन कर आकारणी तसेच आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करण्याकरीता शिबीरामध्ये १३० लोकांनी लाभ घेतला त्यापैकी नामांतरण व कर आकारणीची ३८ प्रकरणे निकाली काढले.

तसेच वसुली काऊटरवर ११ लोकांनी टॅक्सचा भरणा करून लाभ घेतला तसेच ८१ लोकांचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यात आले. शिबीरामध्ये आमदार   कृष्णाजी खोपडे यांनी भेट दिली व त्यांनी नागरीकांना मोठया प्रमाणावर लाभ घेण्यास आव्हान केले. शिबीरामध्ये गणेश राठोड, सहाय्यक आयुक्त, रोशन अहिरे, सहा अधिक्षक व कर निरीक्षक भुषण मोटवरे,  मनिष तायवाडे, लालापा खान,  पंकज फुटाणे, सुर्यकांत रेवतकर, नकीब खान, संतोष समुन्द्रे आदीनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com