पगार विलंबाच्या तणावातून विषारी औषध प्राशन करून इसमाची आत्महत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिटी हॉस्पिटल समोरील कुंभारे ले आऊट येरखेडा परिसर रहिवासी एका इसमाने मागील दोन महिण्यापासून विलंबाने होणाऱ्या पगाराच्या मानसिक तणावातून बाथरूम मध्ये जाऊन एरोपेक्स नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अतुल अशोक रणके वय 40 वर्षे रा कुंभारे ले आऊट ,येरखेडा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक कार्यरत असलेल्या विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून वेळेवर पगार होत नसल्याने मानसिक तणावातून घरातील बाथरूम मध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपरा नाही - भाजपा अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य भोसले यांचे प्रतिपादन

Tue May 23 , 2023
मुंबई :- त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल आयोजित करणाऱ्या मंडळींकडून धूप दाखविण्याची कोणतीही परंपरा नसताना मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट काही जणांनी धरल्यामुळे मंदिर समितीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी समिती नेमली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com