नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदरांजली अर्पित करण्यासाठी मनपा मुख्य कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळुन हुतात्मा दिन पाळण्यात आला. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी (स्मार्ट सिटी) अजय गुल्हाणे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मिलींद मेश्राम, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, कार्यकारी अभियंता मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके व जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार व गांधीसागर उद्यानातील हुतात्मा स्तंभाला मनपातर्फे पुष्पचक्र अर्पण करुन भावपुर्ण अभिवादन केले.