संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कारवाईत अल्युमिनियन तार सह एकुण ७७,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने कन्हान पोलीस स्टेशन परिसरातुन चोरीच्या गुन्हयात दोन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यांनी ३ गुन्हयातील चोरी करून विधृत अल्युमिनियन तार कन्हानच्या कबाडी व्यावसायीकाला विकल्याचे कबुल केल्याने दोन्ही आरोपीस पकडुन चोरीचा अल्युमिनियन तार सह एकुण ७७,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक आरोपी शोध व जुगार रेड कामी फिरत असताना मिळलेल्या गोपनिय माहीतीव्दारे स्थानिय गुन्हे शाखा पथकाने पोलीस स्टेशन कन्हान परिसरातुन चोरीच्या गुन्हयात दोन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यानी पो.स्टे. कन्हान हदीतील मौजा बोरी सिगोरी, केरडी, शिवारात एम एस ई बी चे पोल वरिल अल्युमिनियम चे तार खोलुन चोरी केल्याचे कबुल करून चोरीचा संपुर्ण तार कन्हानच्या एका कबाडी व्यावसायीकाला विकल्याचे कबुल केल्याने कबाडी व्यवसायीक यांचे ताब्यातील तिन्ही गुन्हाचे चोरीच गेलेला अल्युमिनियम तार एकुण किमत ७७ हजार रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) हरिष रामसिग गौतम वय १९ वर्ष व २) प्रफुल्ल सिध्दु धुर्वे वय २२ वर्ष दोन्ही राह. खदान न. ४ याना अटक करून विचारपुस केल्याने त्याने कबुल केले की पोस्टे कन्हान येथे दाखल गुन्हा १) अप क्र१६६/२२, २) अप क्र २१०/२३, ३) अप क्र. ३९४/ २२ च्या कलम ३७९, ४२७ भादंवि आर / डब्लु १३६ महाराष्ट विद्युत कायदा अन्वये दाखल असुन त्यातील मुद्देमाल जप्त करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन करण्यात आले.
कन्हान पो.स्टे. परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लुटमार व चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागपुर ग्रामिण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली. सदर कारवाई नागपुर ग्रामिण पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माखनिकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे यांचा आदेशानुसार स्वत: पो. नि. ओम प्रकाश कोकाटे, पो.हवा. अरविंद भगत, पो.ना शैलेश यादव, वीरेंद्र नरड, मुकेश शुक्ला सह आदी पोलीस कर्मचा-यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.