कामठीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फासला.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 12 :- मागील काही दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते .सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असलेल्या या प्रकारच्या अपहरणाच्या व्हिडिओ ,संदेश व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र भीतीमय वातावरण पसरले होते इतकेच नव्हे तर लहान बालकांमध्ये सुदधा भीती पसरली होती दरम्यान पोलीस विभागातर्फे या भीतीमय वातावरणातून बाहेर काढुन हा अपहरणाचा प्रकार अस्तित्वात नसून फेक बातम्या पसरत असल्याच्या सांगण्यात आले होते मात्र काही दिवस लोटत नाही तोच काल सायंकाळी 7 दरम्यान जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील खलाशी लाईन परिसरात एक अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून सुदैवाने अपहरणाला बळी ठरलेली 14 वर्षीय मुलगी तसेच परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फासला.अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव कमलेश सुरेश भुईया वय 25 वर्षे रा झारखंड असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खलाशी लाईन रहिवासी एक 14 वर्षीय मुलगी शिकवणी वर्ग आटोपुन पायदळ घरी जात असता या मुलीच्या पाळीवर नजर ठेवून असलेल्या झारखंड च्या आरोपीने तिच्या पाठीवर हात थोपटून तिच्या तोंडाला दाबण्याचा प्रयत्न केला मात्र धैर्यवान असलेल्या या मुलीने त्वरित आरोपिला पाय मारुन वाचवा, वाचवा अशी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी एकच जमाव करून मदतीची धाव घेत सदर आरोपीला ताब्यात घेऊन जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या स्वाधीन केले .पोलीसानी सदर पीडित अल्पवयीन 14 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपी कमलेश भुईया विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मागील 15 दिवसआधी ही घडली होती घटना—-

मागील 15 दिवसाआधी जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील जे पी नगर परिसरात एका लोकप्रतिनिधींच्या मुलीशी एका अनोळखी इसमाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली होती ..यावेळी सदर मुलीने सुद्धा आरडाओरड केल्याने अनर्थ टळला होता ..यासंदर्भातही जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com