अवैध्यरीत्या जनावरे वाहतुक करणाऱ्या आरोपींवर कायदेशिर कार्यवाही

केळवद :-दिनांक ०५/०३/२०२४ चे १२/१० वाजता दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलीस स्टॉफ नि मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरेवरून छिंदवाडा कडुन नागपुरकडे जाणार्या हायवे वरील पो.स्टे समोर नाकाबदी करीत असताना मिळालेल्या माहिती प्रमाणे ट्रक क्र. एम. पी-०९/एच. जी- ०३२५ च्या चालकांनी आपले ताब्यातील ट्रक नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता नागपुरख्या दिशेने पळु लागला त्याचा स्टॉफ व पंचासह सरकारी वाहनाने पाठलाग करुन काही अंतरावर जाउन रोडच्या कडेला थांबवुन ट्रक पंचासमक्ष पाहणी केली असता ट्रक क्र. एम. पी- ०९/एन. जी. ०३२५ किंमती १२,००,०००/- रुपये व त्यातील १) ५३ नग बैल गौवंश प्रत्येकी किंमती १५,०००/- रुपये प्रमाणे किंमती ७,९५,०००/- रुपये, असा एकुण १९.९५,०००/- रुपये च्या गाई/वैल/गोरे गौवंश जनावरांना अत्यंत क्रूर व निर्यदयतेने वाहनात डांबुन आकुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुर्या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैद्यरित्या वाहतुक करताना मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करुन सदर गुन्हातील ट्रक क्र. एम. पी-०९/एच. जी. ०३२५ वा चालक संतोप बहोरलाल लोधा वय ५५ वर्ष, रा. फुलपुरा तह. सारंगपुर जि. राजगड (एम.पी) व त्याचा सोबतचा इसम मोहम्मद सारीक मोहम्मद खलील वय ३५ वर्ष रा. वार्ड क्र. ०९ नंदन रोड दमुआ नः ८ तह. छिंदवाडा जि. छिंदवाडा ह.मु. बागफरत अब्जा नगर, बोगदा फुल जवळ भोपाल (एम.पी) या दोन्ही इसमां विरुद्ध कलम ४२९, २७९, ३४ भादवी सहकलम ११(१) (घ) (ड) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागविने प्रतिबंधक अधिनियम-१९६० सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम-१८४ मो.वाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदस्वी कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (प्रा), मा.  अनिल मस्के उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग, सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राकेश साखरकर ठाणेदार पो. स्टे केळवद, पोहवा सुधिर यादगिरे, पोहवा दिनेश काकडे, पोशि गणेश उईके, पोशि धोंडुतात्या देवकते यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीसांची मोहाफुल दारू भट्टीवर धडक कार्यवाही

Thu Mar 7 , 2024
नागपूर :-दिनांक ०६/०३/२०२४ वेळ १०.३० वा. ते ११.१५ वा. रोजी सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक प्रमोद मडावी, शिवा नागपुरे, पोलीस अंमलदार क्रांतीचंद हराळ, मनिश चौकसे, विष्णु लहाने केशव फंड असे दारूबंदी बावत पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन विश्वसनिय माहिती मिळाली की, मौजा; चौरबाहुली जंगल परीसरात नाल्यालगत एक इसम मोहाफुल गावठी दारूची हातभट्टी अवैधरित्या काढत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com