केळवद :- पोस्टे केळवद येथील स्टाफ पोस्टे परिसरात प्रोविशन रेडकामी फिरत असताना मुखबिर कडुन विश्वसनिय खबर मिळाली कि, छत्रापुर खदान येथे १ इसम मोहाफुल हातभट्टी ची दारु गाळत आहे. अशा खबरे वरुन छत्रापुर खदान मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली, अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारी महिला आरोपी ही अवैधरीत्या हातभट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू काढतांना दिसुन आली. दगड विटांचे चुलीवर लोखंडी ड्रम ठेवुन नळी द्वारे मोहाफुल गावठी दारुची रनिंग भट्टी काढतांना आढळुन आली. आरोपीचे ताब्यातून १) ३ निळ्या रंगाच्या इम मध्ये प्रत्येकी २०० लिटर मोहाफुल रसायन सडवा असा एकुन ६०० लिटर प्रती लिटर २०/- रुपये असा एकुन १२,०००/- रुपये २) १ काळया रंगाच्या रवरी ट्युबमध्ये ४० लिटर तयार मोहाफुल गावठी दारु प्रती ५०/- रुपये लीटर प्रमाने एकुन किंमती २०००/- रुपये ३) २० किलो ग्राम मोहाफुल प्रत्येकी ५०/- रुपये किलो असे एकुन १,०००/- रुपये ४) २ निळ्या रंगाचे खाली इम प्रत्येकी किंमत १०००/- रुपये प्रमाने असे एकुन किंमत २,०००/- रुपये ५) २ नग लोखंडी ड्रम मध्ये उकळलेले मोहाफुल रसायनने भरलेले प्रत्येकी १०० लिटर एकूण २०० लिटर प्रती लिटर २०/- रुपये असा एकुन ४०००/- रुपये ६) १ नग लोखंडी खाली डूम प्रत्येकी किमत १२००/- रुपये ७) १ टन जळाउ लाखड कि २५००/- रुपये ८) इतर दारु गाळण्याचे साहीत्य पाईप, जर्मन चमीला ईतर साहीत्य एकुन किमंत ५,०००/- रुपये असा एकूण २९,७००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. आरोपी विरुद्ध पो.स्टे केळवद येथे कलम ६५ (एफ), (सी), (ई), (ब) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (प्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे केळवद येशील ठाणेदार राकेश साखरकर, पोउपनि विलास गेडाम, सफी किशोर ठाकरे, पोहवा मंगेश धारपुरे, पोशि धोंडुतात्या देवकते, सैफुल्ला खलील अहमद यांनी पार पाडली.