नागपुर :- बसपा ने रामटेक मधून नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांना तर नागपुरातून योगराज लांजेवार यांना उमेदवारी दिली. आज बसपाच्या या दोन्ही उमेदवारांनी संविधान चौकात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण व अभिवादन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष परमेश्वर गोणारे, प्रदेश महासचिव सुनील डोंगरे, प्रदेश सचिव पृथ्वी शिंदे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा सचिव अभिलेश वाहने, महिला नेत्या रंजना ढोरे, सुरेखा डोंगरे, तारा गोरखेडे, सुनंदा नीतनवरे, शशिकांत मेश्राम, जगदीश गजभिये, नितीन वंजारी, प्रवीण पाटील उमेश मेश्राम, परेश जामगडे, तपेश पाटील, राम गोणेकर, सदानंद जामगडे यांचे सहित शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.