संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:-माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या वारेगाव सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवडुन आले.
यानूसार वारेगाव सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष पदी कमला लेकुरवाडे, तर उपाध्यक्षपदी रवी गजानन सोमकुवर ची बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कुणाल इटकेलवार , कामठी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे, वारेगाव ग्रा प सरपंच कमलाकर बांगरे, उपसरपंच राजेश मेश्राम, कृष्णा लेकुरवाडे,सतीश लेकुरवाडे यासह सेवा सहकारी सदस्य हेमराज खडसे,पुंडलिक घरत,विठ्ठल घरत,रामराव जाधव, जीवतू देऊरे,प्रकाश देऊरे,दिलेरसिंग यादव,देवराव पांडे,मनोहर लेकुरवाडे, जिजाबाई लेकुरवाडे उपस्थित होते.