कोराडी येथे मंत्री मालिकांच्या कार्यवाही विरोधात जाहीर निषेध

राष्ट्रवादी कांग्रेस आंदोलन
कोराडी – राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची सूडबुद्धीने इडीने चौकशी करून अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ कोराडी येथील संभाजी नगर, महादूला येथील महामार्गावरील चौक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर व राष्ट्रवादी महिला काँग्रेस कामठी-मौदा विधानसभा अध्यक्ष उषा रघुनाथ शाहू यांनी एकत्र येत केंद्रसरकारचा निषेध नोंदविला. केंद्र सरकार सुडबुद्धीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अडकवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार  विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार असल्याने ते पडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महादूला येथील संभाजी नगर चौकामध्ये यावेळी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर, महिला काँग्रेस कामठी-मौदा विधानसभा अध्यक्ष उषा रघुनाथ शाहू यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भायजुमो नागपुर शहर मंत्री पदी अक्षय दाणी यांची नियुक्ती..!

Sun Feb 27 , 2022
नागपुर – नुकत्याच झालेल्या भाजयुमो नागपुर शहर कार्यकारीणीच्या विस्तारामध्ये नागपुर शहर मंत्री पदी अक्षय दाणी यांची नियुक्ती भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांनी केली. नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, माजी महापौर संदीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!