शिल्लक कारणावरून युवकावर चाकूने हल्ला

– चाकू हल्यात युवक जख्मी  

– एक आरोपी अटक, एक आरोपी फरार 

– कन्हान पोलीस स्टेशन हद्दित अशोक नगर येथील घटना 

कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन हद्दित अशोक नगर येथे बुधवार ( 23 ऑगस्ट ) रात्री 9 ते 9.30 वाजता क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात युवक ग़म्भीर जख्मी झाला आहे. गौरव उर्फ तेनाली राऊत ( वय 17 ) रा. अशोक नगर कन्हान असे जख्मीचे नाव असून यातील आरोपी 1) मोनिश उर्फ अक्षय नाटकर 2) आकाश नाटकर रा. अशोक नगर कन्हान अशी आरोपीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे अशोकनगर येथे घरीच श्री.साई नावाने पानठेला आहे . मोनीष उर्फ अक्षय नाटकर सोबत जख्मीचे सिगरेट व खर्रा वरुन एका आठवड्यापूर्वी वाद झाला काहीनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता . घटनादिनी फिर्यादि व जख्मी आपल्या मित्रा सोबत दुचाकीने आले व दुचाकी वरुन उतरून घरी पायदळ जात असताना आरोपीनी आवाज दिला आणि त्या दिवशी क़ाय बोलत होता असे वाद शुरू केला तसेच सोबत बाळगलेल्या चाकूने कमरेवर व खांद्यावर वार केले असून जख्मीने रक्तबंबाळ अवस्थेत पळ काढला . काही मित्रानी त्याला कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारा करिता नेले असता नागपुर मेडीकल मध्ये रेफर करण्यात आले आहे.

फिर्यादि प्रशांत सारवे ( वय 19 ) रा. अशोक नगर याच्या तक्रारी वरुन आरोपी विरुध्द कलम 307 , 504 , 34 अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात एका आरोपीला अटक करण्यात आला असून फरार आरोपी शोध कन्हान पोलीस करीत आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक राजेश जोशी करत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Fri Aug 25 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.24) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जी.बी. हॉस्पीटल, हिल रोड, गांधी नगर, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव कचरा आढळून आल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रकाश कोल्हे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com