संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला तरीही शेतकऱ्यांनी निसर्गावर विश्वास ठेवत नव्या उमेदीने हिम्मत बांधून कामठी तालुक्यातील शेतकऱ्यानी यावर्षी धानपिकावर विश्वास दाखवीत खरीपाचे 25 हजार 80 हॅकटर मध्ये पेरणी नियोजन केले असून त्यात सर्वाधिक पेरा हा धानपिकाचा राहणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कृषी विभागातर्फे कामठी तालुक्यातील खरीप हंगामासाठी बियाणे,खते व कीटकनाशकांच्या मागणीचे नियोजन केले असून या नियोजन आराखड्यात धानाचा पेरा जास्त प्रमाणात राहणार असल्याचे निर्देशित केले असून 25 हजार 80 हॅकटर जमीन ही पेरनियोग्य असल्याचे सांगण्यात आले यामध्ये धान, कापूस, सोयाबीन, तूर, ऊस यासह ,भाजीपाला पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.यानुसार कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 11 हजार 700 हॅकटर मध्ये धान पिकाचे नियोजन केले आहे त्या खालोखाल 5885 हॅकटर मध्ये कापूस, 3500 हॅकटर मध्ये सोयाबीन, 750 हॅकटर मध्ये तूर, 961 हॅकटर मध्ये ऊस नवीन लागवड तसेच उर्वरित क्षेत्रात ज्वार खरीप, विविध भाजीपाला, फुलपिके ,चारापीके,मिरची व इतर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे .