मुंबई – हावडा मार्गावर ‘कवच’ लवकरच

-डिव्हाईसमुळे कळेल रेल्वेला पुढील धोका

– रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन यंत्रणा

हैदराबाद :- धडधड करत रेल्वे गाडी जात असताना अचानक रेल्वे मार्गावर पुढे काही धोका असल्यास याची सूचना रेल्वेला मिळेल आणि रेल्वेगाडी आधीच थांबेल. अशी अत्याधुनिक यंत्रणा मुंबई – हावडा या मुख्य मार्गावर लवकरच बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेची ट्रायल रेल्वे मंत्री आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच हैदराबाद येथे झाली.

अत्याधुनिक अ‍ॅटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन यंत्रणा ‘कवच’ असे या यंत्रणेचे नाव आहे. ही यंत्रणा रेल्वे मार्गावर बसविण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा झारसुगडा ते नागपूर पर्यंत मुख्य मार्ग ‘कवच’ अंतर्गत आणला जाईल.

भारतीय रेल्वेने ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानात बरीच क्रांती केली. रेल्वे वाहतूकीवर नियंत्रण आणि गती मिळविण्यासाठी पारंपरिक सिग्नलला अपग्रेड करून त्याऐवजी अ‍ॅटोमॅटीक सिग्नलिंग यंत्रणा बसवत आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग सेक्शनची गती 130 किमी प्रति तास करण्यात आली आहे. दुर्ग ते झारसुगडा दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कळमना रसमडा (259 किमी), जयरामनगर – बिलासपूर (32 किमी), आणि बिलासपूर – घुटकू (16 किमी.) या सेक्शनमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. भविष्यात चांपा ते गेवरारोड, जयरामनगर ते अकलतारा आणि बिल्हा ते निपनियापर्यंत अ‍ॅटो सिग्नलिंग यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

अ‍ॅटोमॅटीक सिग्नलिंगमुळे गाड्यांची गती तर वाढेलच शिवाय गाड्यांची संख्याही वाढणार आहे. एखाद्या ठिकाणी थांबलेल्या रेल्वे गाडीला समोरची रेल्वे गाडी निघण्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही. स्टेशन यार्डातून गाडी निघताच ग्रीन सिग्नल मिळेल. म्हणजेच एका सेक्शनमध्ये एका पाठोपाठ दुसरी गाडी सिग्नलच्या मदतीने चालत राहील. समजा पुढच्या सिग्नल मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास मागून येणार्‍या गाडीलाही सूचना मिळेल. गाडी आहे त्याच थांबेल.

दोन स्टेशनमधील अंतर आठ मिनिटांनी कमी

आधी दोन स्टेशन दरम्यान एकच गाडी चालायची आता ऑटो सिग्नलिंगमुळे दोन स्टेशन दरम्यान 2, 3 किंवा 4 रेल्वे गाड्या चालू शकतात. दोन स्टेशनमधील अंतर 12 ते 15 किमीचे असते. हे अंतर कापण्यासाठी गाडीला 15 मिनिटांचा अवधी लागतो. आधी 15 मिनिटा नंतर दुसरी गाडी सोडली जायची आता रेल्वेने दोन स्टेशन मधील अंतर सात ते आठ मिनिटांनी कमी केले आहे.

हैदराबादला घेतली ट्रायल

अत्याधुनिक अ‍ॅटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन यंत्रणा ‘कवच’ ची ट्रायल हैदराबाद येथे नुकतीच घेण्यात आली. मुंबई – हावडा मुख्य मार्गावर ही यंत्रणा बसविण्यात येईल.

साकेत रंजन, मुख्य जनसंपर्क अधिकारी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एचआईवी पॉजिटिव थैलेसीमिया रोगी को मिला स्थायी इलाज 

Wed Feb 15 , 2023
नागपूर :-7 साल का रितेश (बदला हुआ नाम) 4 महीने की उम्र से जंग लड़ रहा है। 4 महीने की उम्र में उसे थैलेसीमिया मेजर का पता चला। एक ऐसी बीमारी जिसमें जीवित रहने के लिए हर 3-4 सप्ताह में रक्त चढ़ाने की आवश्यकता होती है। परिवार ने अपने बालरोग विशेषज्ञ व थैलेसीमिया और सिकलसेल सेंटर नागपुर के संचालक डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com