संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दीड वर्षांपासून निवडणुका जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भावी नगरसेवकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने काल 5 जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून मोठी खुशखबर दिली असून कामठी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याचे संकेत दिले आहेत.तर हे परिपत्रक सोशल मीडियावर मोठ्या गतीने व्हायरल होत असल्याने कामठीत सर्वत्र निवडणुका लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाने 5 जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 1 जुलै 2023 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या महानगर पालिका,नगर परिषदा, नगरपंचायती ,जिल्हा परिषदा ,पंचायत समित्या ,ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे .असा आदेश निर्गमित करण्यात आला आहे यावरून रखडलेल्या निवडणुका होणार हे निश्चित झाले त्यानुसार कामठी नगर परिषद ची निवडणूक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल हे निश्चित झाल्याने आजी माजी नगरसेवकात नवउत्साह संचारला आहे.तर सकाळपासूनच या इच्छुक उमेदवारानि भेटीगाठिवर भर दिला आहे.