न्यायमूर्ती भूषण गवई यांची २५ ते ३१ मार्च दरम्यान संयुक्त राष्ट्र अमेरिकेला भेट

– कोलंबिया लॉ स्कूल, हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये व्याख्यान

नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई हे २५ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिकेला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये न्यूयॉर्क येथील कोलंबिया लॉ स्कूल आणि केंब्रिजमधील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कोलंबिया लॉ स्कूल आणि हार्वर्ड केनेडी स्कूल कडून मा.न्यायमूर्ती बी.आर. गवई यांना व्याख्यानासाठी पत्रव्यवहाराद्वारे विनंती करण्यात आली होती. त्याला न्यायमूर्ती गवई यांनी सहमती दर्शविली. २५ ते ३१ मार्चच्या भेटीदरम्यान ते विविध कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहेत. २६ मार्चला न्यूयॉर्क येथील कोलंबिया लॉ स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती बी.आर.गवई ‘परिवर्तनात्मक संविधानवादाची ७५ वर्षे’ (75 Years of Transformative Constitutionalism) या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

२७ मार्चला ते चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रामध्ये न्यूयॉर्क राज्याचे मा. मुख्य प्रशासकीय न्यायाधीश जोसेफ ए. झायास हे देखील उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्राचा विषय ‘कायद्याच्या राज्याच्या संरक्षणात न्यायालयांची भूमिका : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि न्यूयॉर्क राज्याचे मुख्य प्रशासकीय न्यायाधीश यांच्यात एक सांस्कृतिक परिसंवाद’ (‘Role of courts in protecting the Rule of Law: A Cross Cultural Conversation between the Senior Judge, Supreme Court of India and the Chief Administrative Judge for the State of New York’) हा आहे. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती तसेच न्यूयॉर्क राज्यात निवडून आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला न्यायाधीश उशीर पंडित दुरांत या करणार आहेत.

न्यायमूर्ती बी.आर.गवई २८ मार्चला हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये ‘कायदा, राजकारण आणि धोरण यांच्यामध्ये : लोकशाही धोरण निर्मितीमध्ये न्यायपालिकेच्या नाजूक संतुलनाचे परीक्षण’ (‘Between Law, Politics & Policy : Examining the Judiciary’s Delicate Balance in Democratic Policy Making’) या विषयावर संबोधित करणार आहेत. यानंतर २९ मार्च रोजी ते हार्वर्डचे विद्वान आणि सहकाऱ्यांसोबत विविध घटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

होली पर उत्तर भारत की ट्रेनों में कोटा बढ़ाने की मांग 

Wed Mar 20 , 2024
– जेड आर यु सी सी मेंबर सतीश यादव ने रेलवे से की मांग नागपुर :- होली के मध्य नजर उत्तर भारत की दिशा में आने जाने वाली ट्रेनों के साथ-साथ मुंबई पुणे की ट्रेनों में बर्थ का कोटा बढ़ाने की मांग का ज्ञापन जेड आर यू सीसी मेंबर सतीश यादव ने नागपुर सेंटर रेलवे के डीआरएम मनीष अग्रवाल को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com