स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार ता.08) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बाहेती हॉस्पीटल, धंतोली यांच्यावर रूग्णालयातील सामान्य सुका आणि ओला कचरा योग्य प्रकारे वेगळा केला न केल्याबद्दल कारवाई 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच ओजस्वीता कंन्स्ट्रक्शन,लक्ष्मीनगर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्या पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आर्यन स्टील, माऊंट रोड, सदर यांच्यावर बांधकाम सुरू असताना चेंबर ब्लॉक आणि सेव्हर लाइनचे नुकसान केल्याबद्दल कारवाई 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्री महालक्ष्मी डेव्हलपर्स, मानेवाडा रोड, यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्या पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बन्सल टेड्रींग कंपनी, कॉटन मार्केट, या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोनम किराणा स्टोर्स, गंगाबाई घाट रोड, या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. वेगी लिशेष, सी.ए. रोड, नागपूर यांच्यावर रस्त्याच्या कडेला कचरा जाळणे आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण पसरल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

साप्ताहिक विंगचे अधिवेशन १८ जूनला छत्रपती संभाजीनगरात

Fri Jun 9 , 2023
व्हॉईस ऑफ मीडियाच्या छत्राखाली एकवटणार पत्रकार छत्रपती संभाजीनगर :- राज्यातील साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार, १८ जून रोजी छत्रपती संभाजी नगरात होणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्याच्या साप्ताहिक विंगचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद बोरे यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम ट्रस्ट येथे हे एक दिवसीय राज्यस्तरावरील अधिवेशन नियोजित आहे. रविवार, १८ जून २०२३ रोजी वेगवेगळ्या सत्रांमध्ये हे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com