सीएमजीए परिषदेत न्या.भूषण गवई करणार भारताचे नेतृत्व

– कार्डीफध्ये १० सप्टेंबरपासून परिषद : ‘ओपन जस्टीस टूडे’

नागपूर :- यूनायटेड किंगडम मधील कार्डीफ येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशन (सीएमजीए) परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. १० सप्टेंबरपासून पाच दिवसीय सीएमजीए परिषदेला सुरूवात होईल.

‘ओपन जस्टीस टूडे’ अशी सीएमजीए परिषदेची संकल्पना आहे. सीएमजीए इंग्लंड आणि वेल्सच्या लॅटिमर हाउसच्या मार्गदर्शक तत्त्वांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये खुले न्यायालय, न्यायालयीन अहवालातील पारदर्शकता, मानवी हक्क यांच्यासह इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेदरम्यान न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीशांच्या आणि कौन्सिलच्या बैठकीतही सहभागी होतील. ते महत्वाच्या सत्रात मुख्य भाषण करणार आहेत. या परिषदेत कॉमनवेल्थ देशांचे अनेक विद्यमान आणि माजी सर्वोच्च न्यायाधीश सहभागी होत आहेत.

या परिषदेचा उद्देश कॉमनवेल्थ देशांमधील न्यायिक स्वातंत्र्यांच्या मुद्यांकडे लक्ष वेधणे, या देशांमध्ये असलेल्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे, दंडाधिकारी व न्यायाधीशांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय करार आणि कायद्यांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याच्या अधिकाधिक वापराचा विचार करणे, न्यायिक विकासासाठी कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि न्यायाधीशांच्या असोसिएशनमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करणे हा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वयंशासनाने विद्यार्थी झाले आनंदित

Fri Sep 8 , 2023
बेला :- येथील लोकजीवन विद्यालय व महाविद्यालयात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना स्वयंशासनांतर्गत शिक्षक होण्याची संधी मिळाल्याने ते आनंदीत झाले. शाळेचे प्राचार्य सुनील मुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक राजेश शिवरकर, गिरीधर मेश्राम व संपूर्ण शिक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com