संदीप कांबळे, कामठी
-पाच जून रोजी होणार पोटनिवडणूक
कामठी ता प्र 5:-राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निधन,राजीनामा ,अनहर्ता, तसेच इतर कारणामुळे रिक्त झालेल्या ग्रा प सदस्य पदासाठी 5 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.यानुसार कामठी तालुक्यातील खैरी ग्रा प च्या अपात्र झालेल्या महिला सदस्य प्रीती मानकर यांच्या रिक्त जागेसाठी प्रभाग क्र 2 च्या अनु जाती स्त्री प्रवर्गातील एका जागेसाठी 5 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.तशी अधिसूचना तहसीलदार अक्षय पोयाम यांनी प्रसिद्ध केली आहे.
पोटणीवडणुकीचा जाहीर कार्यक्रमानुसार 13 मे ते 20 मे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील .23 मे रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल तर 25 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतींम मुदत राहील. त्यानंतर निवडणूक चिन्ह देऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.तर 5 जुन ला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत निवडणूक मतदान घेण्यात येईल तर 6 जून रोजी मतमोजणी होईल.या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामठी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर राहणार आहेत.
खैरी ग्रामपंचयातच्या रिक्त एक जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com