संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नागपूर महामार्गावरील शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी समोरून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डीजायर कार क्र एम एच 40 बी ई 7514 ने अवैधरीत्या विना परवानगीने विदेशी दारू वाहतूक करीत असता जुनी कामठी पोलिसांनी त्वरित त्या वाहनावर धाड घालून वाहनात असलेले 48 विदेशी दारूची बॉटल किमती 7680 रुपये व जप्त कार किमती 4 लक्ष रुपये असा एकूण 4 लक्ष 7 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची यशस्वी कारवाई आज दुपारी 2 दरम्यान केली असून या कारवाईतून आरोपी अमोल कुडे वय 37 वर्षे रा पटगोवारी तालुका पारशिवनी विरूद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवन्यात आला.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोहवा मेहमूद अन्सारी,रमेश बंजारा, शारीक खान , गोपाल टीके यांनी केली .