संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पत्रकारिता ही सार्वजनिक जीवनाशी निगडीत असून सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात; परंतु याकडे दुर्लक्ष करून ज्या पत्रकारिता क्षेत्राने आपल्याला उभे केले त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलेच पाहिजे. काळानुरूप विकासाच्या व्याख्या बदलत असतात. त्यामुळे आपणाला नक्की कोणत्या प्रकारचा विकास हवाय, याचे भान पत्रकारांनी ठेवण्याची गरज आहे. पत्रकारिता करत असताना बाळशास्त्री जांभेकरांचे आदर्श बाळगणे गरजेचे आहे. असे मौलिक प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
तर सोशल मीडियासह अन्य पर्यायी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्या स्वीकारण्यातील अडचणी, वर्तमानपत्रांचे बिघडलेले आर्थिक गणित आदी सर्व बाबी पत्रकारितेत काम करणाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या आहेत.असे मत कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कामठी शहरातील पत्रकारांचा शाल,श्रीफळ व स्मूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकुर्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे पदाधिकारी किशोरी भोयर, अनुराधा भोयर, प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर ,स्वामी अवधेशानंद स्कुलचे प्रिन्सिपल ईशा मुदगीलिवार,वाईस प्रिंसिपल अविनाश धोटे आदी उपस्थित होते.