नागपूर :- समाज सेविका जया अंभोरे यांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात ५०० महिलानं सोबत भारतीय जनता पार्टीत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला .
जया अंभोरे यांनी ठणकावून सांगितले राजकारणातून समाजकारण करण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला माझ्या संस्थेच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्य करायचे आहे.महिलांसाठी विशेष योजना राबवायच्या आहेत आणि त्यासाठी मला काही अधिकार हवेत आणि हे अधिकार मला भाजप सारखे सरकारच देऊ शकते त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि आरक्षित असलेल्या भाजपा मधला प्रवेश मला नवी ऊर्जा देऊन गेला याप्रसंगी कांचन नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात फक्त काम करणाऱ्या व्यक्ती ला साथ द्या असे आवाहन केले. प्रगती पाटील अध्यक्षा- महिला आघाडी , माजी महापौर नंदा जिचकार अर्चना डेहनकर, भाजप उपाध्यक्ष डॉ रिचा जैन यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.
रश्मी तिरपुडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले