हद्दपार आरोपीस जुनी कामठी पोलिसांनी घेतले ताब्यात..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 3 :- नागपूर शहर परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त च्या आदेशान्वये तडीपार करण्यात आलेला आरोपी इसम हा जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्री मंच परिसरात फिरकत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच सदर आरोपी इसमाकडून सर्व सामान्य व व्यापारी लोकांच्या जीवितास व मालमत्तेस भय व भीती तसेच ईजा होण्याची दाट शक्यता असल्याने त्यास जुनी कामठी पोलिसांनी 2 जानेवारी च्या रात्री 12 दरम्यान शास्त्री मंच चौकातून अटक करण्यात आली असून अटक आरोपी चे नाव शेख सलीम शेख शबीर वय 30 वर्षे रा मच्चीपुल कामठी असे आहे.

सदरची कारवाही पोलीस उपायुक्त श्रवण दत्त , एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक भीताडे,पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने,डी बी पथकाचे दिलीप ढगे,श्रीकांत विष्णुरकर,अंकुश गजभिये,प्रमोद शेळके यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'श्री'च्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत कामठीत अवतरले शेगाव

Tue Jan 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 3:- आज 3जानेवारीला संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज पालखि यात्रेचे टिमकी चौक नागपूर येथून कामठी येथे पोहोचताच ठिकठिकाणी या पालखि यात्रेचे जँगी स्वागत करण्यात आले.ही पालखी यात्रा टिमकी चौक नागपूर येथिल श्री हरिहर गजानन निवसस्थानातून प्रस्थान होऊन रामटेक येथे समापन होणार आहे. ही पालखी यात्रा आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com