‘गुरूजी’ बिरूद मिरवून भडवेगिरी करणाऱ्या भिडेला तुरुंगात टाका – अँड.संदीप ताजने

– महात्मा फुलेंचा अपमान बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही

मुंबई :- पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याच्या अनुषंगाने ‘मनुस्मृती’ विचाराने प्रेरित ‘स्वयंसेवकांची’ एक फळी कार्यरत आहे. ही फळी अग्रणी महाराष्ट्राला कलंकित करण्याचे काम करीत आहेत.सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असलेल्या विदर्भाच्या भूमितून महात्मा गांधींचा अपमान केल्यानंतर देखील भडवेगिरीचा बाजार मांडलेल्या संभाजी भिडेने महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान केला.भिडेची व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमुळे बहुजन समाज संतापला आहे.भिडेने महाराष्ट्रासह अवघ्या देशाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यासह त्यांच्या बोलवित्या ‘मालकांना’ धडा शिकवून,अशा संतप्त इशारा बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी सोमवारी दिला.

भिडे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसारख्या बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त मानसिकतेला अद्दल घडवणे काळाची गरज आहे.पुरोगामी महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकांमधून भिडेंसह त्यांच्या मागील शक्तींना धडा शिकवेल आणि मतपेट्यांमधून निषेध नोंद+वेल,असा दावा अँड.ताजने यांनी केला.

देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत.केंद्र सरकार या मुद्दयांना बगल देत आहेत.मुळ मुद्दयांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भिडे सारख्या लोकांचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचा दावा अँड.ताजने यांनी केला. मणिपूरमधील हिंसाचार, समान नागरी संहिता, देशातील बेरोजगारी, महागाई, धर्माधर्मामध्ये निर्माण झालेली धार्मिक तेढ यावर केंद्र आणि राज्यातील सरकार मुग गिळून गप्प बसले आहे.बहुजनांनी त्यामुळे भिडेंच्या चक्रव्युहात न अडकता अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी सत्ताप्राप्तीचे लक्ष ठेवले पाहिजे,असे आवाहन अँड.ताजने यांनी केले.

महाराष्ट्रात ‘बसपा सरकार’ हेच बहुजनांचे ध्येय -भीम राजभर

बहुजन नायक कांशीराम यांच्या प्रेरणेने बहन मायावती यांनी देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता येताच महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह इतर महात्म्यांचे नाव राज्यभरात कोरले. ‘महात्मांच्या’ नावाने शैक्षणिक केंद्र उभी केली.विद्यादानाचे काम केले. पंरतु, समाज सुधारणेची जननी असलेल्या महाराष्ट्रातच जर मुलींना शिक्षणांच्या मुख्यप्रवाहात आणणाऱ्या महात्मा फुलेंचा अपमान होत असेल तर बहुजन समाज तो खपवून घेणार नाही. ‘बहुजन’ अर्थात ‘बहुसंख्यांकांनी’ राज्यासह केंद्रात सत्ता केंद्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे,असे आवाहन पक्षाचे प्रदेश प्रभारी भीम राजभर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मटका अड्डे पर छापे में जप्त नगदी गायब !

Mon Jul 31 , 2023
– मटका व्यवसायी का वणी पुलिस पर संगीन आरोप  वणी :- स्थानीय इंदिरा चौक निवासी आशीद खान आजारुल्ला खान ने 28 जुलाई 2023 को स्थानीय पुलिस थाने के निरीक्षक को एक लिखित शिकायत दी.इस पत्र द्वारा वणी पुलिस पर गंभीर आरोप लगाया गया कि उन्होंने 2 दफे छापे मारे और उन छापे में जप्त नगदी का अधिकांश हिस्सा गायब कर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com