संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आजच्या स्पर्धात्मक युगात पुरुषांच्या आजची स्त्री ही पूर्वीसारखे चूल आणि मुलं इतक्या पर्यंत मर्यादीत राहली नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात यश पादांक्रीत करीत आहे.ते फक्त परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे!तेव्हा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा समाज व देश निर्माण करण्याचा आपण सर्वानी संकल्प करणे गरजेचे असल्याचे मौलिक मत ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ,माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला भारतीय संविधान अर्पण केले. व भारतीयांनी हे संविधान अंगीकृत करीत अधिनियमित केले .आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे परिसर स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्रात स्थापित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून विशेष बुद्ध वंदना करून मानवंदना वाहण्यात आली.तसेच संविधान प्रस्तविकेचे सामूहिक वाचन करीत संविधान दिन चिरायू होवो चा गाजर करण्यात आला.
याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी, हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्र चे पदाधिकारी, शिक्षकवृंदगण तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्तागण प्रामुख्याने उपस्थित होते.