आय टी विभागाचे प्रधान सचिव यांनी केली  स्मार्ट सिटीच्या ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ची पाहणी

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे संचालित श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरची सोमवारी (ता. ४) माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रबंध संचालक जयश्री भोज यांनी पाहणी केली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. उपस्थित होते.
याप्रसंगी मनपा आयुक्तांनी  असीम गुप्ता यांचे तर भुवनेश्वरी एस. यांनी जयश्री भोज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पाहणीदरम्यान असीम गुप्ता यांनी सिटी ऑपेरेशन सेंटर तर्फे नागपूर शहरात लावण्यात आलेले ३६०० कॅमेरे, सार्वजनिक घोषणा तसेच इतर व्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती घेतली. ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले यांनी ऑपेरेशन सेंटरमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारांना लवकर पकडण्यासाठी व शहरात अपघात झाला असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीस विभागाला मिळते. सोबतच ट्राफिक पोलीस कर्मचारी या केंद्रामधूनच वाहनांवर नजर ठेवतात. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ऑनलाईन चालान सुद्धा करतात. याव्यतिरिक्त वाहतुकीचे नियम, स्वच्छता किंवा कोणत्याही सार्वजनिक सूचना/जनजागृती करण्यासाठी चौकाचौकात स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून शहरात प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. शील घुले यांनी यावेळी दिली.
सिटी ऑपरेशन केंद्र तांत्रिकदृष्टया आणखी कसे अद्ययावत करता येईल याविषयी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव  असीम गुप्ता आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रबंध संचालक जयश्री भोज यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, इंफ्रा व मोबिलिटी विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, ई गव्हर्नन्स विभागाचे अनुप लाहोटी, कुणाल गजभिये, अपूर्वा फडणवीस इत्यादी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महा मेट्रोच्या सायकल सेवेला नागपूरकरांचा प्रतिसाद 

Mon Apr 4 , 2022
– ६०० सायकलचा नियमित वापर करीत आहेत नागपूरकर,डिजिटल बुकिंग सोयीमुळे तरुणांमध्ये वाढत आहे आकर्षण नागपूर, ४ मार्च :- मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना त्यांचा संपूर्ण प्रवास सुखकर होण्याकरता महा मेट्रोतर्फे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि फिडर सर्विस सारख्या संकल्पना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत सायकल आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट तत्वावर आधारित विविध वाहनांची सेवा मेट्रो स्टेशनवर पुरवली जात आहे. या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com