संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सईद नगर रहिवासी विवाहित इसमाने घरी कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरातील खोलीत पंख्याला रस्सी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री 1 दरम्यान घडली असुन मृतक इसमाचे नाव जुबेर शेख मजर शेख वय 36 वर्षे रा सईद नगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनार्थ मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले आहे.आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले करीत आहेत.