मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिटचे निमंत्रण

युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई :  युगांडा मध्ये होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-2022 चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो, भारतातील उच्चायुक्त मार्गारेट क्योजिरे, मुंबईतील वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल, युगांडातील इंडियन असोसिएशचे अध्यक्ष मोहन राव, महासचिव वाहिद मोहम्मद, कंपालातील इंडियन बिझनेस फोरमचे सचिव मोहन रेड्डी आदींचा समावेश होता.

या भेटीत उभय देशांतील विविध क्षेत्रातील विकास प्रकल्प प्रगतीबाबत चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युगांडामधील एकंदरीत विकसनशील वाटचालीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो यांनी युगांडाच्या इतिहास आणि प्रगतीबाबत माहिती देताना युगांडामध्ये गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक भारतीय उद्योजकांनी या देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून युगांडाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आगामी गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजनाही राबविली जाईल. भारत आणि युगांडा देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण  ओकेलो यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने कृषि, पर्यटन, खनिकर्म आणि शिक्षण क्षेत्रावर भर दिला आहे. त्यादृष्टीने राज्य शासन काम करीत आहे. या क्षेत्रांच्या विकासासाठी दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर पूरक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही राष्ट्रांत गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील श्री गणेशाचे दर्शनही घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी.

Fri Sep 9 , 2022
प्रशासनाचे व्हावे सुशासन…! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा   मुंबई :  सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!