शेताच्या वादातुन नातेवाईकाने महिलेस अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात किमी अंतरावर मौजा खोपडी शेत शिवारात आरोपीने ज्योती गजभिये हिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार ज्योती विनोद गजभिये राजु गुलाब जामगडे हे नातेवाईक असुन बहीण व भाऊ आहे. गुरूवार (दि.२३) जुन ला सकाळी ७ ते ८ वाजता दरम्यान खोपडी शेत शिवारात ज्योती गजभि ये हया शेताची मशागत करीत असतांना आरोपी राजु जामगडे हा शेतात आला व ज्योती गजभिये हिला धमकी देत हे शेत माझे आहे आणि मी आपल्या नावा ने करून घेतले आहे. अश्लील शिवीगाळ करून तु हया शेताची वाही जुपी करायची नाही. आता तु जर दिसली तर तुला आणि तुझ्या परिवारातील लोकांना हयाच शेतात गाडुन तुमच्या सगळ्यांची समाधी येथेच बनवीन अशी धमकी दिल्याने कन्हान पोस्टे फिर्यादी ज्योती गजभिये यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी राजु जामगडे यांचे विरुद्ध कलम २९४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com